Child Welfare
sakal
नाशिक: टाके देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील हंडोगे दांपत्याने आपली तीन मुले दत्तक दिली किंवा त्यांची विक्री केली असल्याच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल विभागीय महिला व बालकल्याण विभागाकडे सादर केला. या अहवालाच्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना प्रत्यक्ष पाहणी करून स्वतंत्र चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.