Devendra Fadnavis
sakal
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २४) त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेत पूजन केले. राज्यात भाजपला चांगले यश लाभो, असे साकडे यानिमित्ताने त्यांनी श्री त्र्यंबकराजाला घातले. मुख्यमंत्र्यांनी मंदिर परिसरातील गणेशमूर्तीसमोर भाजपच्या राज्यव्यापी प्रचाराचा नारळ फोडला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.