Garbage Stench Forces Trimbakeshwar
sakal
नाशिक
Trimbakeshwar News : ज्योतिर्लिंगाच्या पवित्र नगरीत दुर्गंधीचा कहर! त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयामागील कचरा डेपो स्थलांतर कधी?
Garbage Stench Forces Trimbakeshwar Tehsil to Seek Relocation : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीमागे जमा झालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले असून, तहसील कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
किरण कवडे- नाशिक: देशातील बारा ज्योर्तिलिंगामध्ये समाविष्ट असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कचऱ्याची दुर्गंधी आता सहन होण्यापलीकडे गेली आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे या दुर्गंधीने हैराण झाले असून, ‘तहसील’साठी पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे. एक तर कचरा डेपो स्थलांतरित करा किंवा ‘तहसील’ इतरत्र हलविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
