Godavari River
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात, तशीच अवस्था गोदावरी नदी व येथील ऐतिहासिक कुंडांची झाली आहे. कुंडांमध्ये नाल्यांचे दूषित पाणी मिसळते. सांडपाण्यामुळे गोदावरी पात्रातील काळवंडलेल्या पाण्यात स्नान कसे करायचे, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने भाविकांनी उपस्थित केला आहे.