गोदापात्रावर सिमेंट कॉंक्रिटऐवजी ‘प्री कास्ट बॉक्स’

गोदापात्रावर सिमेंट कॉंक्रिटऐवजी ‘प्री कास्ट बॉक्स’
Published on: 
फोटो : 35300/01/02/03/04/05/06 त्र्यंबकेश्‍वर : गोदावरी नदीपात्रावरील सिमेंट काँक्रिट काढण्याचे सुरू असलेले काम. ----- गोदापात्रावर सिमेंट काँक्रिटऐवजी ‘प्री कास्ट बॉक्स’ त्र्यंबकेश्‍वरमध्ये चौथ्यांदा स्लॅब काढण्याची कारवाई; तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आव्हान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : त्र्यंबकेश्‍वर शहरातून भूमिगत वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रावरील सिमेंट काँक्रिटचा स्लॅब काढून त्याऐवजी आता ‘प्री कास्ट बॉक्स’ बसविण्यात येणार आहेत, जेणेकरून ‘बॉक्स’ काढल्यानंतर नदीपात्र स्वच्छ करता येईल आणि पुन्हा बॉक्स बसविण्यात येतील. त्र्यंबकेश्‍वरमध्ये दर्शनपथ टप्पा दोनअंतर्गत ‘एमएसआयडीसी’मार्फत विविध कामांना गती दिली जात आहे. यात तेली गल्ली येथील नीलगंगा ते गायत्री मंदिरापर्यंत साधारणतः ३०० मीटर अंतरावरील सिमेंट काँक्रिट काढण्यात येत आहे. यात गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित ठेवण्याचे प्रयत्न आहेत. नदी प्रवाहित राहिल्यास नवीन कुशावर्तापर्यंत हे पाणी पोहोचेल आणि भाविकांना कुंभमेळ्यात स्नानाचा आनंद घेता येईल. तीर्थराज कुशावर्त तीर्थावर मर्यादित भाविकांनाच स्नान करता येते. हजारो भाविक एकाच वेळी स्नान करतील यादृष्टीने पेगलवाडी येथील नवीन घाटांवरील नियोजन आहे. त्यादृष्टीने दर्शनपथ टप्पा दोनअंतर्गत त्र्यंबकेश्‍वर शहरातील मुख्य रस्त्यावरील सिमेंट काँक्रिट काढण्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहे. सिमेंटऐवजी या ठिकाणी अडीच मीटर खोल आणि सहा मीटर रुंदीचे ‘प्री कास्ट ब्लॉक’ बसविण्यात येतील. ब्लॉक काढल्यानंतर नदीपात्र स्वच्छ करता येईल. सुरक्षेसाठी पुन्हा हे ब्लॉक बसविण्यात येणार आहेत, जेणेकरून गोदावरी कायमस्वरूपी प्रवाही राहील. पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. रथोत्सवासाठी संत निवृत्तिनाथांच्या रथाची मागणी येत्या २४ तारखेला त्र्यंबकेश्वर पौर्णिमा रथोत्सव आहे. यंदा रथोत्सवासाठी श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांचा रथ आणावा आणि रथोत्सव साजरा करावा, अशी मागणी वजा सूचना नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमधील गंगा स्लॅबच्या कामामुळे भाविक रस्त्यावर म्हणजे स्लॅबवर थांबू शकणार नाहीत. अशा गर्दीत भव्य लाकडी रथ मिरवणे अवघड होणार असल्याची चर्चा आहे. यावर काहींनी रथाची पूजा करून रथ लक्ष्मीनारायण चौकापर्यंत आणावा, तिथून माघारी न्यावा आणि रथातील देव पालखीने कुशावर्त तीर्थावर न्यावे, असे सांगितले. काही भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या रथाची पूजा करावी; परंतु प्रत्यक्षात श्री संत निवृत्तिनाथ महाराजांचा चांदीचा रथ आणून यात त्र्यंबकेश्वराची मूर्ती मिरवावी. त्र्यंबकेश्वर रथ ओढण्यासाठी तीन चार बैलजोड्यांची गरज पडते. त्याऐवजी संत निवृत्तिनाथांचा रथ केवळ एक बैलजोडी ओढेल, अशी मागणी केली. गोदावरी नदीपात्रावरील स्लॅबचा पूर्वेतिहास १९५६ : प्रथमच स्लॅब १९९१-९२ : दुसऱ्यांदा बदल करून पाइप व स्लॅब २००३-०४ : तिसऱ्यांदा चॅनल व स्लॅब २०२६-२७ : चौथ्यांदा सिमेंट काँक्रिट काढून ‘प्री कास्ट बॉक्स’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.