त्र्यंबकेश्वर: येथील ज्योतिर्लिंग मंदिर जगप्रसिद्ध म्हणून ख्याती पावले असून, भाविकांची संख्या सतत वाढतच आहे. गर्दी वाढत असली तरी त्या प्रमाणात दर्शनव्यवस्था न केल्याने रोज वादाचे प्रसंग घडत आहेत. सर्वांत कडी म्हणजे शनिवारी (ता. १६) भाविकांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारल्याने भाविकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.