Godavari river
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेने विविध कामांच्या निविदा काढल्या आहेत. गर्दी नियोजनाचा एक भाग म्हणून कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक नांदूर व दसक शिवारात प्रत्येकी एक असे दोन, तर त्र्यंबकेश्वरला एक घाट बांधण्यास परवानगी दिली आहे. घाट बांधण्यासाठी एकूण २४४ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.