नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वरला गर्दी होणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान व परिसराच्या विकासासाठी शासनाने २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.