Kumbh Mela
sakal
नाशिक: प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा यशस्वी करताना कामांच्या सुरुवातीलाचं क्लब टेंडरिंगसह ठेकेदारांची रिंग चर्चेत आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.४) मुंबईत होणाऱ्या बैठकीत पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. कुंभमेळ्याचा आराखडा मंजूर होण्याची अपेक्षा असून, आराखडा मंजूर न झाल्यास किमान साधुग्रामसह बाह्यरिंग रोडसाठी निधीची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.