Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे काऊंटडाऊन शुक्रवार (ता.३१) पासून सुरू झाले आहे. त्यामुळे विविध शासकीय यंत्रणांमार्फत सिंहस्थाशी निगडित विकासकामांना गती देण्यात येत आहे. यासर्व कामांचे एकत्रित नियंत्रण व ट्रॅकिंगसाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे एका क्लिकवर कामांच्या सद्यःस्थितीची माहिती उपलब्ध होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोमवार (ता.३) पासून या प्रणालीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.