Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत दोन अमावास्या आणि एक सूर्यग्रहणाचा योग तब्बल १८० वर्षांनंतर जुळून आला आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामांचा प्रारंभ झाला. प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात झालेली नाही किंवा त्यांना अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी विकासकामे पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर मुख्य आव्हान आहे.