Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीमधील दर्शनपथ व शहरांतर्गत डीपी रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच विविध यंत्रणांमार्फत कामांच्या मान्यता व प्रशासकीय मान्यता पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांना आचारसंहितेचा अडसर येणार नाही, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. दरम्यान, आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या (ता. ७) दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे.