Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधे आलेले अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री तथा श्री पंचदशान जुना आखाड्याचे महंत हरिगिरी महाराज यांच्या हस्ते बुधवारी (ता.१०) रामतीर्थावर गोदावरी आचमन (पूजन) करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा, अशी मनोकामना केल्याचे महंत हरिगिरी महाराजांनी सांगितले.