Devendra Fadnavis
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन आखले असताना विरोधक अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करून विस्थापनाबाबत नकारात्मक प्रचार करत आहेत. शहर विकासाबाबत आमची भूमिका सकारात्मक असून, आम्ही स्थापना करायला आलो आहोत. विकासकामांवेळी कोणीही स्थानिक विस्थापित होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इगतपुरीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.