नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये कोट्यवधींची विकासकामे प्रस्तावित आहेत. रस्ते, नदीघाट, पुलासारख्या कामांचा समावेश त्यात आहे. कामांसाठी १५ महिन्यांची डेडलाइन ठरविताना प्रशासनाने डिसेंबर २०२५ व मार्च २०२६ अशा दोन टप्प्यांत निधी खर्चाचे नियोजन केले. त्यामुळे कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.