Journalist Attack
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांची बैठक होती. त्यासाठी नाशिक येथून शनिवारी (ता. २०) त्र्यंबकेश्वरला गेलेल्या वृत्तवाहिन्यांच्या तीन पत्रकारांना वाहनाच्या प्रवेश पावतीवरून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.