Farmer Protest
sakal
त्र्यंबकेश्वर: कुंभमेळा कालावधीसाठी उभारण्यात येणाऱ्या पर्यायी स्नानव्यवस्थेच्या कामांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये संतापाचा स्फोट झाला आहे. गोदावरीवर नवे घाट, दोन तीर्थकुंडे आणि हरित रस्ता उभारण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादित केल्या जात आहेत. मात्र, बाजारभाव २५ ते ४२ लाख रुपये प्रतिगुंठा असताना शासनाने केवळ २४ हजार रुपये प्रतिगुंठा दर मंजूर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या ‘कवडीमोल’ मोबदल्याविरोधात शनिवारी (ता. २१) आत्मदहनाचा इशारा देत आंदोलकांनी चक्क सरण रचले.