Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात उभारण्यात येणाऱ्या नव्या नदीघाटांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात सोमवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला.‘आधी सविस्तर चर्चा करा, विश्वासात घ्या; अन्यथा काम बंद पाडू.’ त्यामुळे बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.