Election
sakal
त्र्यंबकेश्वर/नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या त्र्यंबकेश्वर पालिकेच्या निवडणुकीत विक्रमी ८५.६६ टक्के मतदान झाले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकला. साधू-महंत, पुरोहितांसह पुजाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदारांमध्ये दिवसभर कमालीचा उत्साह दिसून आला. पोलिस आणि उमेदवार, प्रतिनिधींमधील किरकोळ वादाची घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.