Crime
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर परिसरातील कोलंबिकादेवी ट्रस्टच्या मोकळ्या जागेत पुरलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी सुरुवातीला जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात संबंधित व्यक्तीचा मृत्यू जंगली हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यातून झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, पुढील पोलिस तपासात तो खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी एका गुराख्याला अटक केली.