
2027 साली महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अमृतस्नानाच्या तारखा नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जाहीर करण्यात आल्या आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही ठिकाणं हिंदू धर्मातील चार प्रमुख कुंभ स्थानांपैकी एक मानली जातात. यामुळे याठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याकडे देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय भाविकांचे लक्ष असते.