Trimbakeshwar Temple : त्रिपुरारी पौर्णिमा रथोत्सव: त्र्यंबकेश्वरमध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद, सामान्य भाविकांना दिलासा
VIP Darshan Closed Till November 5 for Rathotsav : त्र्यंबकेश्वर येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या रथोत्सवामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी पाऊस सुरू असूनही आद्य ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
त्र्यंबकेश्वर: येथील रथोत्सवानिमित्त पाच नोव्हेंबरपर्यत व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. दरम्यान दिवाळी सुटी संपली असली तरी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. रविवारी (ता.२) पाऊस सुरू असूनही भाविकांनी गर्दी केली होती.