illegal constructions
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा दुसरा दिवसही बुलडोझरच्या गर्जनेने गाजला. ‘नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा’ने (एनएमआरडीए) सुरू ठेवलेल्या कारवाईत आतापर्यंत जवळपास ६० टक्के रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या कारवाईच्या विरोधात शेतकरी, व्यावसायिक आणि बँक चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, तिची सुनावणी शुक्रवारी (ता. १७) होणार आहे. या सुनावणीत काय निर्णय दिला जातो, याकडे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराचे लक्ष लागले आहे.