Nashik Trimbakeshwar Road
sakal
नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना ‘एनएमआरडीए’ने आता घरे पाडण्याची नोटीस बजावली आहे. दिवाळी संपताच या कारवाईला सुरवात होणार असल्याने ऐन सणाच्या काळात नागरिकांना आपले घर सोडण्याची वेळ आली. यात पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या घरावरही बुलडोझर फिरणार आहे.