त्र्यंबकेशवर/नाशिक: श्रावणातील हलक्या सरी झेलत ‘हर हर महादेव...’, ‘बम बम भोले...’, ‘शंकर भगवान की जय...’ असा जयघोष करीत भाविकांनी तिसऱ्या श्रावणी सोमवार (ता. ११)निमित्त फेरी पूर्ण केली. भाविकांच्या गर्दीने त्र्यंबकेश्वरनगरी दुमदुमून गेली होती. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेत आबालवृद्धांसह महिलांचा सहभाग वाढल्याने दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी सोमवारची पर्वणी साधल्याचे समोर आले.