नाशिक: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले असताना शहरातील जुन्या बसस्थानकात त्यांना अक्षरश: गाळातून चालावे लागले. या गाळातून चप्पल, बूट घालून चालणे अवघड झाल्याने भाविकांना आपली पादत्राणे हातात घ्यावी लागली. गाळाने भरलेल्या पायांनी बसमध्ये जागा शोधताना भाविकांचा मनस्ताप झाला.