त्र्यंबकेश्वर: शेवटच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. रविवारी रात्रीपासूनच भाविक शहरात दाखल होत होते. सोमवारी (ता. १८) पहाटेपासूनच पूर्व दरवाजाजवळ लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सतत हलक्या सरींचा सामना करीत भक्त दर्शनासाठी जात होते. गर्दीचा अंदाज घेऊन देणगी दर्शन व ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्यात आले होते.