Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी राज्याच्या शिखर समिती व मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन कुंभमेळा नियोजनाचा आराखडा तत्काळ प्रसिद्ध करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी कुंभमेळा प्राधिकरणाला दिले आहेत. तसेच, सर्व विभागांनी आर्थिक तरतूद करताना अर्थसंकल्पीय पुरवणी निधीची मागणी नोंदवावी, असेही त्यांनी नमूद केले.