Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या निवासासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात तंबूचे शहर उभारण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी बैठकींचे सत्रही पार पडले. मात्र आवश्यक निधीची जबाबदारी कोण घेणार, यावरून सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि पर्यटन विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.