Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना 8 दिवस दर्शन नाही

Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Templeesakal

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकेश्वराचे मंदिर येत्या ५ ते १२ जानेवारीदरम्यान बंद राहणार आहे, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Trimbakeshwar Temple
Nashik News : नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर रेल्वेमार्ग व्हावा; कुंभमेळा निधीत तरतुदीची अपेक्षा

भाविकांना दर्शन घेता येणार नाही

अतिप्राचीन ज्योतिर्लिंग मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून, देखभाल व काही डागडुजी करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मंदिर पूर्णपणे बंद राहील. भाविकांना दर्शन घेता येणार नाही.

या कालावधीत भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मंदिरातील गर्भगृह पिंडीची, पाळची होत असलेली झीज थांबविणे व महादेवाच्या पिंडीचे संवर्धन करण्यात येणार आहे. 

Trimbakeshwar Temple
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपींसाठी जादा शुल्क घेण्यात चुकीचे काय?

संवर्धनाचे हे काम पुरातत्त्व विभागामार्फेत करण्यात येत आहे. सर्व भाविक व हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी, असे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com