Trimbakeshwar Temple
sakal
नाशिक: देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी येणाऱ्या २५ हजार भाविकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. श्रावणात लाखो भाविक आल्यानंतर शहराच्या सुविधांवर ताण येतो, अशा परिस्थितीत ऐनपावसाळ्यात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविकांचे काय होणार, अशी चिंता येथील साधू-महंतांकडून व्यक्त केली जाते.