नाशिक- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर व परिसराला सिंहस्थ पर्वानिमित्त नव्याने झळाळी मिळणार आहे. त्र्यंबक शहरातील ऐतिहासिक मंदिरे आणि प्राचीन कुंडांचे जतन, देखभाल व सौंदर्यीकरणासाठी केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागांनी मिळून सुमारे २५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला.