Nashik News : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे शिवारात तिहेरी अपघात

Vehicles involved in an accident near Pathare village on the Shirdi highway
Vehicles involved in an accident near Pathare village on the Shirdi highwayesakal

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे शिवारात शनिवारी दुपारी तिहेरी अपघात घडला. झाडांना पाणी घालण्यासाठी रस्त्यावर मधोमध उभा असलेल्या पाण्याच्या टँकरवर पाठीमागून धडकलेल्या एर्टिगा कार वर डस्टन गो कार धडकून हा अपघात झाला.

रस्त्याच्या मधोमध लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या मोंटोकार्लो कंपनीचा टँकर चालकाने निष्कळजीपणाने उभा केल्यामुळे पाठीमागून धडकलेल्या दोनही कारचे प्रचंड नुकसान झाले.

अपघात घडल्यावर चालकाने सदर टँकर घटनास्थळावरून पळवून नेला मात्र टँकरला जोडलेला लोखंडी पाईप तेथेच गळून पडला होता. (Triple accident due to car collide water tanker Pathare area incident on Shirdi highway Nashik News)

पाथरे शिवारात मुंबईतील साई भक्तांच्या खाजगी आराम बसला झालेल्या भीषण अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावर शनिवारी दुपारी पुन्हा अपघात झाला. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली असून या झाडांना पाणी टाकण्याचे काम मोंटोकार्लो कंपनीमार्फत टँकरद्वारे करण्यात येते.

दुपारी टँकरद्वारे नेहमीप्रमाणे पाणी टाकण्याचे काम सुरू होते. मात्र हे काम सुरू असताना कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आली नव्हती. वास्तविक पाहता टँकर रस्त्यावर उभा केल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनांना आकलन व्हावे यासाठी सेफ्टी गार्ड ठेवणे आवश्यक आहे.

मात्र याकडे संबंधित टँकर चालक व या कामावर नियंत्रण असलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या टँकरची कल्पना पाठीमागून येणाऱ्या वाहनांना आली नसावी.

टँकर पुढे चालत असावा असे समजून गुजरात येथील साई भक्तांची एर्टिगा कार क्रमांक जी जे 16 बीबी 7410 वेगात पाठीमागून आली व उभ्या असलेल्या टँकरवर धडकली. या अपघातात एरटिगाच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले.

तर एर्टिगा पाठोपाठ असलेली डस्टन गो कार क्रमांक एम एच 43 बी इ 1137 देखील पुढे असलेल्या एर्टिगा कार वर धडकली. या अपघातात एर्टिगा कारमधील तीन ते चार प्रवासी जखमी झाले. अपघात घडल्यानंतर पाथरे येथील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. हा अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने मात्र अपघात स्थळावरून टँकर घेऊन पळ काढला.

उशिरापर्यंत टँकर शोधण्याचे काम....

कंपनी व्यवस्थापनाच्या गलथानपणामुळे गेल्या वेळी बसमधील प्रवाशांना जीव गमावा लागल्याचा ठपका ठेवत मोंटोकार्लो कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज देखील याच निष्काळीजपणामुळे दोन वाहने अपघातग्रस्त झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती समजल्यावर वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अपघातास कारणीभूत ठरलेल्या टँकरचा शोध घेण्यात होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

फोटो - दुसऱ्या छायाचित्रात टँकरचा अपघात स्थळी गळून पडलेला पाईप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com