Nashik Crime News: गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी पकडला लाकडाचा ट्रक; अवैध वृक्षतोड व वाहतूकीवर कारवाईचा बडगा

truck carrying illegal timber was seized in Chirai Ghat nashik news
truck carrying illegal timber was seized in Chirai Ghat nashik newsesakal

Nashik Crime News : अवैध वृक्षतोड तसेच वाहतूकीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार वनविभागाकडून कठोर पाऊल उचलत कारवाई केली जात असल्याने वृक्षप्रेंमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान रात्री वनकर्मचारी गस्तीवर असताना चिराई घाटात अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला असून कारवाई सुरू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. (truck carrying illegal timber was seized in Chirai Ghat nashik news)

 मालेगाव प्रादेशिकसह ताहराबाद व सटाणा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वृक्षतोड करून बिनबोभाट वाहतूक केली जात होती. याबाबत नाशिक वनविभागाच्या आधिका-यांना वृक्षप्रेंमींकडून तक्रार करण्यात आली होती. वरिष्ठांकडून अवैध वृक्षतोड व वाहतूकीवर तातडीने दखल घेत ताहराबाद, सटाणा व मालेगाव परिसरात रात्रीतून गस्त वाढवून कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आले होते.

दरम्यान तिनही वनपरिक्षेत्रातील आधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीतून गस्त वाढवून अनेक लाकूड वाहतूकीवर कारवाई केली आहे. ताहराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी रात्रीतून गस्तीवर असताना चिराई (ता.बागलाण) घाटातून ट्रक (क्रमांक एमएच ४१, एयु ६६७५) अटकाव करून पहाणी केली असता लाकडाने खचाखच भरलेला आढळून आला.

truck carrying illegal timber was seized in Chirai Ghat nashik news
Onion Subsidy News : कांदा अनुदानापासून 619 शेतकरी वंचित; पडताळणीअंती ठरविले अपात्र

वनकर्मचा-यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन सदर ट्रक जप्त करून वनविभागातील आवारात उभा केला असून कारवाईचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले तर दुसरा टेम्पो (क्रमांक एमएच ३१, एपी ७१९५) सोमपुर येथे रात्री पकडण्यात आला होता मात्र या टेम्पोतून बाभळीची लाकूड असल्याने सोडून देण्यात आले. वनविभागाकडून रात्रीतून होत असलेल्या गस्तीमुळे अवैध लाकूड वाहतूक करणा-यांची चांगलीच दमछाक उडवून दिल्याने अनेक लाकूड माफियांनी व्यवसाय बंद केल्याची चर्चा होत आहे. 

"वरिष्ठांच्या आदेशानुसार वनविभागाकडून रात्रीतून गस्त वाढविण्यात आली असून अवैध वृक्षतोड व वाहतूकीवर कारवाई केली जात आहे. तसेच शेतक-यांना शेतातील झाडांची अडचण होत असेल तर रितसर परवानगी घ्यावी." -शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र आधिकारी ताहराबाद.

truck carrying illegal timber was seized in Chirai Ghat nashik news
Nashik News : नांदगावच्या दुष्काळाची राष्ट्रवादीकडून दखल; पक्षाध्यक्ष शरद पवारांशी चर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com