Crime
sakal
नाशिक
Crime News : काळजीवाहू ‘रक्षक’च निघाला ‘भक्षक’!; मूकबधिर मुलीवरील अत्याचार प्रकरणी दुहेरी जन्मठेप
Deaf-Mute Girl’s Note Exposes Heinous Crime in Tuljapur School : तुळजापूर येथील मूकबधिर शाळेत झालेल्या अत्याचारप्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे-खांडवी यांनी दाखवलेल्या संवेदनशील तपासामुळे आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. न्यायालयात पीडित मुलीची सांकेतिक भाषेतील साक्ष ऐकून सर्वजण भावुक झाले.
एका १३-१४ वर्षांच्या अल्पवयीन मूकबधिर मुलीने तोडक्या-मोडक्या भाषेत एका कागदावर शाळेतीलच सेवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे लिहिले आणि कागद एका महिला कॉन्स्टेबलला दिला. तिने तो कागद महिला सहायक पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे-खांडवी यांना दिला आणि तपास सुरू झाला. त्यांनी कसून तपास करीत आरोपीला गजाआड तर केलेच, शिवाय त्यांनी केलेल्या तपासामुळे आरोपीला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
