मुले पळविणारे समजून दोघा सख्या भावांना चोप अन् ते निघाले...

Citizens beating suspects
Citizens beating suspectsesakal

जुने नाशिक : मुले पळविणारे समजून दोघा सख्ख्या भावांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. जखमी झालेल्या दोघांची पोलिसांनी सुटका करत जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. चौकशीअंती दोघे लहान मुलांना चोरणारे नसून अट्टल चोर असल्याचे स्पष्ट झाले. एका चारचाकी चालकाची पैसे असलेली बॅग चोरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याची माहिती समोर आली. (two brothers beaten as child abductors nashik Latest Marathi News)

Citizens beating suspects
नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी गडावर रविवारपासून खासगी वाहनांना ‘No Entry’

शुक्रवारी (ता. २३) गंजमाळ परिसरात ही घटना घडली. घटनेची भद्रकाली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली. चौकशीत संशयित साहिल व्यंकटेश लक्ष्मीकुंठे (३१) आणि प्रभास व्यंकटेश लक्ष्मीकुंठे (१८, दोघे रा. औरंगाबाद) हे दोघे सख्खे भाऊ चोरी करण्याच्या उद्देशाने गंजमाळ परिसरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले.

इंदिरानगर येथील संजय येवले यांच्या कारमधील (एमएच- १५- डीएम- ५४८०) पैसे असलेली बॅग चोरी करण्याचा प्रयत्न केला. श्री. येवले यांनी गंजमाळ येथील किराणा दुकानातून किराणा खरेदी केला. बॅगेतून पैसे काढून विक्रेत्यास दिल्याचे संशयितांनी पाहिले. त्यातील एकाने मागील नंबर प्लेटवर रंग टाकला.

त्यानंतर येवले घरी परतत असताना दुसऱ्या संशयिताने त्यांच्या कारच्या डिक्कीतून काहीतरी पडत असल्याचे भासवले. त्यांनी कारचा वेग कमी करताच संशयितांनी बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काचा लावून घेतल्याने बॅग चोरीचा प्रयत्न फसला. येवले यांच्या लक्षात येताच त्यांनी चोर, चोर आरडाओरड करताच संशयितांनी पळ काढला.

दरम्यान, गंजमाळ पंचशीलनगरमध्ये पळत असताना तेथील रहिवाशांना दोघे लहान मुलांना चोरणारे असल्याचा संशय आला. त्यांनी दोघांनाही धरून जबर चोप दिला. पोलिसांच्या चौकशीत दोघे मुलांना चोरणारे नसल्याचे समोर येताच रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Citizens beating suspects
मला ज्यांनी मोठे केले, ते माझ्याबरोबरच : Shiv Sena पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com