
Nashik News : वर्गखोल्या दुरुस्तीसाठी सिन्नरला अडीच कोटी रुपये!
सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून २ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे तालुक्यातील ३१ गावामधील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आता हक्काच्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षण घेता येणार आहे. (Two half crore rupees to Sinnar for classroom repair Nashik News)
जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी ५ टक्के निधी हा जिल्हा परिषद शाळांना राखीव ठेवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गांची दुर्दशा झाल्याने त्यांची दुरुस्ती करणे व आवश्यक तिथे नवीन वर्गखोल्या बांधकाम करणे गरजेचे असल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभागाला तत्काळ गावनिहाय शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधकामाचे प्रस्ताव बनविण्याच्या सूचना केल्या होत्या.
६ गावामध्ये नवीन ११ वर्ग खोल्यांसाठी १ कोटी ५ लाख ६० हजार रुपये तर २५ शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या कामांना प्रशासकीय मंजुरी देताना ९ महिन्यांच्या आत संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागास केल्या आहेत.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
हेही वाचा: Nashik News : BJP नेत्याच्या टॉर्चरिंगला कंटाळून एकाची आत्महत्या!
या गावांत होणार कामे...
जिल्हा परिषद शाळांच्या नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्यासाठी प्रत्येक खोली निहाय ९ लाख ६० हजार रुपये मंजूर झाले आहेत. एकूण १ कोटी ५ लाखातून तालुक्यातील रामपूर, धनगरवाडी, कारवाडी येथे प्रत्येकी एक, शहा येथे २ तर इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर व भंडारदरावाडी येथे प्रत्येकी ३ वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत.
वर्गखोल्या दुरुस्तीसाठी उजनी, नरोडेवस्ती (पाथरे), पिंपळे येथे प्रत्येकी १० लाख, दुसंगवाडी येथे ८ लाख, कोळगाव माळ, खंबाळे येथे प्रत्येकी ७ लाख, खडांगळी, निमोणी मळा (वावी), वडांगळी, नरोडेवस्ती देवपूर, मेंढी, हिवरे, या शाळांसाठी प्रत्येकी ५ लाख तर शिंदेवाडी, धनगरवाडी येथे ४ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.
हेही वाचा: Nashik News : विद्यार्थ्यांचे आधार दुरूस्तीने शिक्षक हैराण! संचमान्यतेसाठी बंधनकारक