गायीच्या पोटातून 'हे' काय निघाले? तब्बल 3 तास शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow

गायीच्या पोटातून 'हे' काय निघाले? तब्बल 3 तास शस्त्रक्रिया

निफाड (जि.नाशिक) : तालुक्यातील करंजगाव येथील प्रमोद राजोळे यांच्या गायीच्या पोटातून ज्या गोष्टी आढळल्या. त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वाघ यांचे मदतनीस डॉ. म्हसकर यांनी सलग तीन तास शस्त्रक्रिया केली. (Two-kilos-of-plastic-removed-from-cow-stomach-nashik-marathi-news)

गायीच्या जीवाला धोका...

दुधाची पिशवी असू द्या की, भाजीची पिशवी किंवा किराणा, प्रत्येक वस्तू प्लॅस्टिकमध्ये बंद करून विक्री होते. काम संपले की त्या पिशव्या रस्त्यात टाकतात. काही वेळा शिळे अन्न, लग्नसमारंभात उरलेले अन्न किंवा शिल्लक भाजीपाला प्लॅस्टिकमध्ये बंद करून कचराकुंडीमध्ये फेकण्यात येतो. यामुळे गाय प्रत्येक प्लॅस्टिकमध्ये अन्नच असल्याचे समजून प्लॅस्टिकच खाते. गायीने खाल्लेले प्लॅस्टिक तिच्या पोटात विरघळत नाही. त्यामुळे या पिशव्या शस्त्रक्रियेशिवाय निघत नाहीत. प्रमोद राजोळे यांच्या वस्तीवर नियमित तपासणीसाठी डॉक्टर आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. गायीला होत असलेल्या त्रासाबद्दल शेतकरी राजोळे यांच्याकडून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वाघ यांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर गायीवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. प्रमोद राजोळे यांच्या गायीच्या पोटातून दोन किलोचे चऱ्हाट व प्लॅस्टिक काढण्यात आले. खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वाघ यांचे मदतनीस डॉ. म्हसकर यांनी सलग तीन तास शस्त्रक्रिया करून गायीला जीवदान दिले.

हेही वाचा: कोरोनाच्या भितीने फार्महाउसवर गेलेल्या नगरसेवकांना आर्त हाक

हेही वाचा: नाशिकमध्ये लसीसाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा

Web Title: Two Kilos Of Plastic Removed From Cow Stomach Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top