Latest Marathi News | नारळाच्या झाडावर चक्क बिबट्यांची चढाई... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lepards

Nashik : नारळाच्या झाडावर चक्क बिबट्यांची चढाई...

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी धनगरवाडी (पिंपळगाव) रस्त्यालगत सांगवी शिवारात रामनाथ कोंडाजी घुमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर दोन बिबट्यांनी चढाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (two leopards climbing on coconut tree at sinnar Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : NMCला 26 कोटींचे अनुदान

आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबट्यांच्या भांडणाचा आवाज ऐकल्याने नारळाच्या झाडापासून काही अंतरावर असलेल्या घुमरे यांच्या घरातील बाहेर धावली. त्यावेळी सरळसोट वाढलेल्या नारळाच्या झावळ्यांमध्ये दडलेला एक बिबट्या खाली उतरत असल्याचा थरकाप उडवणारा प्रकार बघायला मिळाला.

हा बिबट्या झाडालगच्या मक्याच्या शेतात उतरणार तोच खालून दुसऱ्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. अन विद्युत वेगाने दोन्ही बिबटे नारळाच्या झाडाच्या शेंड्याला पोहोचले. दरम्यान काळजाचे ठोके वाढवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि घुमरे वस्ती कडे लोकांची पावले वळली.

दोन दिवसांपूर्वी याच भागात बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: Crime Update : महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी संशयिताला अटक

Web Title: Two Leopards Climbing On Coconut Tree At Sinnar Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..