Leopard
sakal
सटाणा - ठेंगोडा (ता. बागलाण) शिवारातील ठेंगोडा-आराई रोडवरील शिलावटे मळा परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता.७) रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास अशोक मालजी शिलावटे यांच्या घरासमोरून दोन बिबट्यांनी दोन कुत्र्यांना उचलून मक्याच्या शेतात नेल्याची घटना घडल्याने परिसर हादरला आहे. वनविभागाने तातडीने याठिकाणी तातडीने पिंजरा लावून ठोस उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.