Nashik Dengue Disease : शहरात दोन संशयित डेंगी रुग्णांचा मृत्यू ?

Dengue
Dengue esakal

Nashik Dengue Disease : शहरात दोन संशयित डेंगी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु वैद्यकीय विभागाने हा दावा फेटाळून लावताना दोन्ही रुग्णांची नमुने अधिक तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, डेंगीचे संकट शहरात वाढत असून, रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने महापालिकेकडून जनजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. (Two suspected dengue patients died in city nashik news)

पावसाळा संपल्यानंतर शहरात आता रोगराईचे प्रमाण वाढताना दिसत आहे. टेरेस, गॅलरी व अडगळीतली जागेमध्ये साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंगी डास तयार होत असल्याने त्यातून रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात १२१ नवीन रुग्ण आढळले. जुलै महिन्यात शहरात १४४ डेंगी रुग्ण होते.

ऑगस्ट महिन्यात ११७, तर सप्टेंबर महिन्यात २६१ रुग्णांना डेंगीची लागण झाले. ऑक्टोबर महिन्यात २४ दिवसात शहरात डेंगीचे १२७२ संशयित रुग्ण आढळून आले.

Dengue
Dengue Fever in Children: लहान मुलांमध्ये डेंग्यूची झपाट्याने वाढ, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

सिडको विभागातील कर्मयोगीनगरमधील एका संशयिताचा २२ ऑक्टोबरला खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर २४ ऑक्टोबरला आणखीन एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. परंतु महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डेंगीने सदरचे मृत्यू झाले. नसल्याचा दावा फेटाळून लावताना पुण्याच्या एनआयव्ही लॅबकडे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

कर्मयोगीनगरमधील रुग्णाचा यकृताचा कावीळ झालेल्यांचा खुलासा करण्यात आला आहे. तर, आनंदवली येथील डॉक्टरचा मृत्यू किडनीच्या आजारामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयाकडून दोन्ही रुग्णांच्या फाइल मागून तपासण्यात आल्याचा दावा वैद्यकीय अध्यक्ष डॉ. तानाजी चव्हाण यांनी केला.

Dengue
Dengue-Malaria Difference : डेंगू आणि मलेरियामध्ये नेमका फरक काय ? जाणून घ्या दोन्हींची ‘ही’ लक्षणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com