लघुशंकेसाठी गेला अन्‌ दुचाकी चोरट्यांनी लांबविली

bike theft latest marathi news
bike theft latest marathi newsesakal

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाकडून (police Commissionerate) गेल्या दोन दिवसांपासून गटारी अमावस्येच्या (gatari amavasya) पाश्‍र्वभूमीवर कडेकोट नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून तपासणी सुरू आहे. असे असतानाही नाशिक शहर-परिसरातून चोरटे दुचाक्यांच्या चोरून (Bike theft) नेत आहेत.

नाकाबंदीलाही न जुमानता होत असलेल्या दुचाक्या चोरीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, शहरातून तीन दुचाक्या चोरीला गेल्या असून, एक दुचाकीस्वार तर लघुशंका करीत असताना पाठीमागून त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. (two wheeler stolen nashik crime Latest Marathi news)

नाशिक शहर परिसरातून गेल्या दोन दिवसात महागड्या चारचाकी वाहने चोरीला गेल्या असताना आज पुन्हा तीन दुचाक्या चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. म्हसरुळ - आडगाव लिंकरोडवरील रस्त्यालगत दुचाकी पार्क करून चालक लघुशंका करीत असताना अज्ञात चोरट्याने पाठीमागून दुचाकी चोरून नेल्याचा अजबगजब प्रकार घडला आहे.

महेश गायधनी (रा. देवराज कॉम्प्लेक्स, दिंडोरी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या बुधवारी (ता.२७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हसरुळ-आडगाव लिंकरोडने जात होते. त्यावेळी जगन्नाथ लॉन्सजवळ ते रस्त्यालगत दुचाकी पार्क केली.

त्यावेळी चावी दुचाकीलाच होती. गायधनी हे लघुशंका करून परत आले असता त्यांची ३५ हजार रुपयांची स्प्लेंडर दुचाकी अज्ञात दोघा तरुणांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bike theft latest marathi news
पुणे महापालिकेच्या पाणी पट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार

समकित राका (रा. गोविंदनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या २३ तारखेला ते कमोदनगर येथील हॉटेल ग्रेट पंजाब हॉटेलशेजारी असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी साडेसात वाजता गेले असता, सर्व्हिस रोडलगत त्यांनी दुचाकी पार्क केली.

परत आले असता त्यांची १० हजार रुपयांची ॲक्सेस मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सोनटक्के (रा. आनंदनगर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या २१ तारखेला रात्री साडेसात ते पावणे नऊ वाजेच्या दरम्यान राहत्या घरासमोर पार्क केलेली १० हजार रुपयांची महागडी स्पीड सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bike theft latest marathi news
Nashik : CET, पुणे विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com