Nashik Crime: शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; आठवड्यात 6 दुचाकी लंपास

Bike theft latest marathi news
Bike theft latest marathi newsesakal

Nashik Crime : शहर व परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच आहे. किरकोळ अपवाद वगळता दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे.

अशातच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे एक लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी एका आठवड्यात लंपास करण्याचे प्रकार घडले. (Two wheeler theft session continues in city 6 bike stolen in week Nashik Crime)

येथील कलेक्टरपट्टा भागातील रमेश शंकर चौधरी (वय ४३, रा. योगेश्‍वर कॉलनी) यांची दुचाकी (एमएच ४१ आर ३१७६) चोरट्यांनी २९ मे रोजी कृष्णा लॉन्सच्या प्रवेशद्वाराजवळ उभी केलेली असताना चोरुन नेली.

दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार सटाणा रस्त्यावरील जनलक्ष्मी बँकेजवळ घडला. शहरातील आंबेडकर नगर भागातील कडू अहिरे (वय ४९) यांची दुचाकी (एमएच४१ एडब्ल्यु ३००८) बुधवारी (ता. ७) सायंकाळी पाचच्या सुमारास फिरदोस गंज अबू अय्युब मशीदजवळून चोरीला गेली.

मुश्‍ताक शेख इस्माईल (वय २६, रा. आझादनगर) यांची दुचाकी (एमएच ४१ एआर २८०८) चोरट्यांनी चोरुन नेली. २ जूनला रात्री सव्वानऊ ते सव्वादहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. आदिवासी नगरात चौथा दुचाकी चोरीचा प्रकार घडला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bike theft latest marathi news
Shrirampur Crime : बायकोबद्दल वाईटसाईट बोलल्याच्या रागातून चॉपरने वार करून तरुणाची हत्या

किशोर भुरा कुवर (वय २४, रा. दरेगाव) यांची दुचाकी (एमएच ४१ एडी ६७९१) चोरट्यांनी शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या व सातत्याने पोलिसांचा राबता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील एका हॉटेल समोरून चोरी केली.

याकुब युसूफ शेख (वय ४३, रा. खंडाळा, वैजापूर, संभाजीनगर) यांची दुचाकी चोरट्यांनी २८ मे ला सकाळी सात ते साडेसात चोरीला गेली. शोएब अली नवाब अली (वय २८, रा. रौनकाबाद) यांची दुचाकी (एमएच ४१ एएच ५१६३) २ जूनला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास नवीन बस स्थानकाच्या स्वच्छतागृह पाठीमागील भिंतीलगत उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली.

या प्रकरणी छावणी, आझादनगर, शहर, आयशानगर, कॅम्प या पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीचे प्रकार घडले.

Bike theft latest marathi news
Ration Scam Crime : शासकीय धान्याचा काळाबाजार; रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com