Nashik Crime News : दुचाकी चोरटा गजाआड; दोघे फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bikes seized from thieves by police station officials.

Nashik Crime News : दुचाकी चोरटा गजाआड; दोघे फरार

वावी (जि. नाशिक) : सिन्नर तालुका, नाशिक शहर, नगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळण्यात वावी पोलिसांना यश आले आहे. तर अंधाराचा फायदा घेत दोघे जण पळून गेले आहे. सूरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे सराईतचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहे. (Two wheeler thief arrested Both absconding Nashik Crime News)

हेही वाचा: Nashik News : दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत! 2 दिवसापासून सलग दर्शन

वावी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, चोर्‍यांचे सत्र वाढल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलिसांनी नांदूरशिंगोटे भागात रात्रीची गस्त वाढविली होती. याच वेळी कोते हे भास्कर जाधव, रत्नाकर तांबे हे नांदूरशिंगोटे परिसरात गस्त घालत असताना नांदूरशिंगोटे गावात बायपास जवळ तीन इसम संशयितरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांच्याजवळ जात त्यांची चौकशी सुरु केली असता त्यांनी पळ काढला. याच वेळी पोलिसांनी पाठलाग करत सूरज कापसे यास अटक केली.

या वेळी सराईत सूरज याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने जोडीदार तुषार गोरडे, निखिल वाल्हेकर यांच्या साथीने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या. चोरलेल्या दुचाकी या सराईत यांनी वाळूंज आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीतून चोरल्या आहेत. संशयित तुषार गोरडे (रा. पारेगाव, ता. संगमनेर) याच्यावर यापूर्वी इंदिरानगर, मुंबई नाका, उपनगर, चंदननगर, संगमनेर, लोणीकंद या पोलिस ठाण्यात ८ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. तांदळकर करत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : घरफोडीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक