Nashik News : जगभरातील नाण्यांचा खजिना नाशिकला! डॉ. सुनीता पाठक यांची मविप्रच्या संग्रहालयाला अनमोल भेट

275 Foreign Coins Added to Udaji Maharaj Educational Heritage Museum : प्रा. डॉ. सुनीता पाठक यांनी आशिया आणि युरोपातील ३० देशांतील २७५ चलनी नाणी ‘मविप्र’च्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयास भेट दिली. या नाण्यांद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक चलन इतिहासाची ओळख होणार आहे.
global currency history

global currency history

sakal 

Updated on

नाशिक: ‘चीनी युआन’ ते ‘इंडोनेशियन रुपिया’ आणि युरोप खंडातील ‘युके पौंड स्टर्लिंग’ ते ‘फिनलंडचे युरो’. अशा २५ ते ३० देशांमधील तब्बल २७५ प्रकारच्या चलनी नाण्यांचा खजिना मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयास मिळाला. अनेक देशांमध्ये अध्यापन आणि संशोधन करताना संकलित केलेली नाणी प्रा. डॉ. सुनीता पाठक यांनी भेट स्वरूपात दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com