
नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्पष्ट आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते दत्ता गायकवाड यांनी दिली. विशेष म्हणजे, ही घोषणा पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आली, जेव्हा संजय राऊत यांचा गायकवाड यांना थेट फोन आला आणि बडगुजर यांच्या हकालपट्टीची सूचना देण्यात आली. या घटनेने नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना जन्म दिला आहे.