मातृसंस्थेने केलेला सन्मान समाधानाचा क्षण

मातृसंस्थेने केलेला सन्मान समाधानाचा क्षण
Published on: 
NSK26H32132 जळगाव : मणियार विधी महाविद्यालयात ॲड. उज्ज्वल निकम यांचा सत्कार करताना पदाधिकारी. शेजारी अभिनेते राजकुमार राव आदी. ----- मातृसंस्थेने केलेला सन्मान सर्वोच्च समाधानाचा क्षण उपशीर्षक ॲड. निकम : केसीई सोसायटी- मणियार महाविद्यालयातर्फे सत्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : जीवनात अनेक मानसन्मान मिळाले. मात्र, ज्या शिक्षण संस्थेने पाया रचला आणि ज्या मातीत कायदे शिक्षणाचे धडे गिरवले, त्या मातृसंस्थेतून होणारा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि सर्वोच्च समाधानाचा क्षण आहे, असे भावनिक उद्‌गार विशेष सरकारी वकील तथा राज्यसभा सदस्य ॲड. उज्ज्वल निकम यांनी काढले. केसीई सोसायटी संचालित एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातर्फे ॲड. निकम यांचा नुकताच सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील महाकवी कालिदास सभागृहात हा कार्यक्रम झाला. सोसायटीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भालचंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. मंचावर संस्थेचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. शिल्पा बेंडाळे, एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी उपस्थित होते. ॲड. उज्ज्वल निकम यांचा सपत्नीक, अभिनेते राजकुमार राव, निकम यांच्या कन्या शर्वरी, पुत्र ॲड. अनिकेत, पुतणे रोहित यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानपत्राचे वाचन केले. ---- ‘प्रहार’ चित्रपटाचा ट्रेलर आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद कार्यक्रमात ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला. नंतर ॲड. उज्ज्वल निकम आणि राजकुमार राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या कायदेविषयक आणि अभिनय क्षेत्रातील विविध प्रश्नांना दोघांनीही मनमोकळी उत्तरे दिली. समन्वयक डॉ. विजेता सिंग यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com