युक्रेन-रशिया वादाचे तीव्र पडसाद; भारतीयांनी तात्काळ युक्रेन सोडावे

युक्रेन-रशिया वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आवश्‍यकता नसल्‍यास भारतीयांनी, विद्यार्थ्यांनी तात्‍पुरत्‍या स्वरूपात युक्रेन सोडावे, अशा सूचना युक्रेनमधील भारतीय दूतावासातर्फे दुसऱ्यांदा जारी केल्‍या
रशिया-युक्रेन वाद
रशिया-युक्रेन वाद sakal

नाशिक : आंतरराष्ट्रीय स्‍तरावर तणाव निर्माण करणाऱ्या युक्रेन-रशिया वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आवश्‍यकता नसल्‍यास भारतीयांनी, विद्यार्थ्यांनी तात्‍पुरत्‍या स्वरूपात युक्रेन सोडावे, अशा सूचना युक्रेनमधील भारतीय दूतावासातर्फे दुसऱ्यांदा जारी केल्‍या आहेत. तसेच, प्रवासी वाहतुकीसाठी मंगळवार (ता. २२)पासून विशेष विमानसेवेची व्‍यवस्‍थादेखील केलेली आहे.

रशिया व युक्रेन यांच्‍यातील ताणलेल्‍या संबंधांचे पडसाद जागतिक स्‍तरावर उमटत आहेत. वाद मिटण्याची शक्‍यता वर्तविली जात असताना, प्रत्‍यक्षात परिस्‍थिती विपरीत असल्‍याचे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सूचना जारी करत भारतीय नागरिक, तेथे शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यांनी तात्‍पुरत्‍या स्वरुपात युक्रेन सोडण्याचा सल्‍ला जारी केला होता.

त्‍यापाठोपाठ रविवारी (ता. २०) दुसऱ्यांदा सूचनापत्र जारी केले आहे. यातही भारतीयांनी तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात युक्रेन सोडण्याचा पुनरुच्चार केला आहे. उच्चस्‍तरावरील तणावाची परिस्‍थिती व अनिश्‍चितता लक्षात घेता ज्‍या भारतीयांचे युक्रेन येथे राहणे आवश्‍यक नाही, अशा सर्व भारतीयांनी तात्‍पुरत्‍या स्वरूपात युक्रेन सोडावे, असे सूचनेत नमूद केले आहे. विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्‍या ‘स्‍टुडंट कॉन्‍ट्रॅक्‍टर’ यांच्‍या आणि दूतावासाच्‍या संपर्कात राहण्याचा सल्‍ला दिला आहे.

उद्यापासून विशेष विमानसेवा

युक्रेनमधून मायदेशी भारतात परत येऊ इच्‍छिणाऱ्या नागरिकांसाठी विशेष विमानसेवा उपलब्‍ध असणार आहे. याअंतर्गत युक्रेनची राजधानी कीव येथील विमानतळावरून भारतातील दिल्‍ली विमानतळाकरिता विशेष विमान मंगळवारपासून झेपावणार आहे. मंगळवार, गुरुवार (ता. २४) आणि शनिवार (ता. २६) असे तीन दिवस एअर इंडियामार्फत विमानसेवा उपलब्‍ध असणार आहे, अशी माहिती भारतीय दूतावासातर्फे जारी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com