Latest Marathi News | 5 रुपयाच्या नोटेवर अघोषित बंदी!; व्यावसायिकांकडून घेण्यास टाळाटाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Five Rupee Note

Nashik News : 5 रुपयाच्या नोटेवर अघोषित बंदी!; व्यावसायिकांकडून घेण्यास टाळाटाळ

जुने नाशिक : पाच रुपयांची नोट चलनातून बाद केल्याचे कुठल्याही प्रकारचे आदेश नाही. तरीही व्यवसायिकांकडून नोटा घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. एकप्रकारे त्यांच्याकडून अघोषित बंदी आणली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सहा वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट चलनातून बाद केली होती. त्यासंदर्भातील अधिकृत अशी घोषणा करण्यात आली होती. (Unannounced ban on 5 rupee note Avoid buying from professionals Nashik Latest Marathi News)

पाच रुपयाच्या नोट बंदबाबत अद्याप सरकार किंवा रिझर्व्ह बँकेतर्फे कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. असे असताना विक्रेते पाच रुपयांची नोट घेण्यास नकार देत आहे. काही वर्षांपूर्वी नोट बंद झाल्याच्या अफवेनंतर अनेक दिवस पाच रुपयांची नोट विक्रेता आणि नागरिकांकडून घेणे- देणे बंद केले होते. ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा व्यवहारात पाच रुपयाच्या नोटेचा वापर करण्यात येत होता. परंतु, काही वर्षभरापासून किंबहुना त्यापेक्षा अधिक काळापासून पुन्हा पाच रुपयाच्या नोटेबाबत विक्रेता आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बहुतांशी किरकोळ विक्रेते, व्यापारी, मोठे व्यावसायिक पाच रुपयाची नोट घेण्यास टाळाटाळ करत आहे. नागरिकांकडे असलेल्या नोटा बिनकामाच्या ठरत आहे. दुसरीकडे बाजारातदेखील पाच रुपयाची नोट दिसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, पाच रुपयाची नोट चलनातून बाद नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी. नोटेवर कुठल्याही प्रकारची बंदी नाही. विक्रेता व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करावी. जेणेकरून सर्वांमध्ये असलेल्या शंकाचे निरसन होण्यास मदत होईल.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Nashik Crime News : सिद्धिविनायक पतसंस्थेतील अपहार; चौघा संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

वादाच्या घटना

नागरिक किराणा दुकानांमध्ये खरेदीस गेल्यानंतर त्यांनी दुकानदारास पाच रुपयाची नोट देण्याचा प्रयत्न केला असता, दुकानदारांकडून नोट चालत नाही असे म्हणून की स्वीकारण्यास नकार दिला जातो. त्यातून दुकानदार आणि नागरिकांमध्ये किरकोळ वाद होण्याच्या घटनादेखील घडत असतात.

"पाच रुपयाची नोट बंद झाली असल्याची कुठलीही अधिकृत घोषणा नाही. तरीदेखील बाजारात व्यवसायिकांकडून नोट घेण्यास टाळाटाळ केली जाते. नागरिकांमध्ये संभ्रम होत आहे. त्यामुळे नोट बंद आहे की सुरू, याबद्दल सरकारतर्फे आदेश काढण्यात यावे."

- झुबेर हाश्मी, सामाजिक कार्यकर्ता

हेही वाचा: Nashik Plastic Ban : पंचवटीत प्लॅस्टिक वापरणाऱ्यादुकानदारांना 15 हजाराचा दंड!

टॅग्स :NashikCurrency