नाशिक- शहरातील सर्वच भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगला वाढला आहे. मात्र, यातच महावितरणाकडून देखील मॉन्सून पूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे काही काळ वीज पुरवठा बंद करावा लागतो असे सांगत वीजपुरवठा वेळीअवेळी खंडित केला जात आहे. उकाड्यामुळे अंगाची चांगलीच लाहीलाही होत असताना दिवस रात्र वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. या मुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत.